कुटुंबिय खालच्या घरात झोपलेले अन् वरच्या खोलीतून चोरट्याने रोकडसह दागिणे लांबविले

0

जळगाव – शहरातील अक्सानगर परिसरात कुटुंबिय खालच्या घरात झोपलेले असतांना मध्यरात्री चोरट्याने वरच्या खोलीत खिडकीची जाळी जोडून प्रवेश करत लाकडी कपाटातून 40 ते 50 हजार रुपयांची रोकड व 20 ग्रॅम सोन्याचे दागिणे असा मुद्देमाल लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अक्सानगर परिसरातील हॉटेल गुलशन ए हिंद या हॉटेलच्या पाठीमागे हारुन मुसा पटेल वय 55 यांचे दुमजली घर आहे. पत्नी फातेमा बी, मुलगा आरीफ पटेल, मुलगी सलमा पटेल, जावई आझाद पटेल व नातवंडासह ते वास्तव्यास आहेत. एम.पी अ‍ॅक्वा नावाने त्यांना जारचा व्यवसाय असून घरीच पाण्याचा प्लॉन्ट आहे. शुक्रवारी रात्री हारुन पटेल यांच्यासह कुटुंबिय हे खालच्या घरात झोपले होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास वरच्या खोलीत झोपलेल्या सलमा पटेल या सुध्दा वरच्या खोलीला कुलूप लावून खालच्या खोलीत झोपण्यास आल्या.

*शेजारच्या तरुणामुळे प्रकार उघड*
घरासमोर राहणार्‍या तरुणाने वरच्या घराच्या खिडकीची जाळी तुटलेली असल्याची माहिती पटेल कुटुंबियांना दिली. त्यानुसार वरच्या खोली जावून पाहणी केली असता, किचनजवळील रुमचे दोन्ही लाकडी कपाटाची कुलूप तोडून ते उघडलेली होती, तसेच त्यातील तिजोरीचे कुलूप तुटलेले होते, तसेच पलंगांवरील गाद्याही अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. चोरीची खात्री झाल्यावर सलमा पटेल यांनी कपाटात पाहणी केली असता, कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले जारच्या पाण्याच्या व्यवसायाचे जमविलेले 40 ते 50 हजार रुपयांची रोकड नव्हती. तसेच सलमा यांचे कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणेही नव्हते. त्यांनी हा प्रकार भाऊ आरिफ पटेल यांना कळविला. जारचे पोहचवून आरीफ पटेल हे घरी आले. त्यांनीही पाहणी केली. व तक्रारीसाठी वडील हारुन पटेल यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

Copy