कुंभारवाड्यात बैलपोळ्याची लगबग

0
तळेगाव दाभाडे : गणरायाच्या निरोपानंतर तळेगाव दाभाडेमधील मूर्तीकाम करणारे कलाकार आता नवरात्राच्या देवीमूर्ती, बैल पोळ्याचे बैल व दिवाळीतील किल्ल्यावरील चित्रे बनविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यामुळे गणपती नंतर कलाकारांच्या घरात आजूनही धावपळच चालू आहे.
तळेगाव शहरात पारंपारिक पद्धतीने मातीकाम करणारे अनेक कलाकारांची घरे आहेत त्यांच्याकडून वर्षभर गणेशमूर्ती, नवरात्राच्या देवीमूर्ती, बैल पोळ्याचे बैल, दिवाळीतील किल्ल्यावरील चित्रे तसेच पिण्याच्या पाण्याचे माठ घडविण्याचे काम अजूनही पारंपारिक पद्धतीने केले जात असल्याची माहिती मूर्तिकार विठ्ठल दरेकर यांनी सांगितले. गणपतीनंतर मावळ तालुक्यात भाद्रपद महिन्यातील बैल पोळा साजरा केला जातो. त्यासाठी घरोघरी पूजा करण्यासाठी मातीचे बैल बनविण्याचे काम सध्या मूर्तिकाराकडून जोरात चालू असून अखेरचा हात फिरवण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. तर देविमुर्ती बनविण्यासाठी तयारी जोरात चालू आहे. याशिवाय दिवाळीत घरोघरी बनविण्यात येणारे किल्ले त्यावरील सर्व प्रकारची चित्रे तसेच तयार किल्ले बनविण्याचे काम जोरात चालू आहे.
Copy