कुंभमेळ्यात कोरोनाचा हाहाकार

हरिद्वार – कुंभमेळ्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून २ हजारहून अधिक भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात करोना रुग्ण आढळून आले आहेत. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ म्हणजे जवळपास ६०० करोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये ४०८ रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये २ हजार ८१२ रुग्ण उपचार घेत आहेत.