किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी साडे अकरा लाखाचा धनादेश

0

शिरपूर:तालुक्यातील किसान विद्या प्रसारक संस्थेतर्फे धुळे जिल्हाधिकारी संजय यादव हे शिरपूर दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री सहायता निधीत ११ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

सध्या कोरोनाची महामारी राज्यासह देशात सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन संकटात सापडले आहे. यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी मदतीचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे स्वातंत्र्यसैनिक कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या विचारसरणीने रंधे परिवार व किसान विद्या प्रसारक संस्थेने मदत करण्याचे ठरविले आणि त्यातून जमा झालेले ११ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी शिरपूर-वरवाडे नगरपालिका कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, डीवायएसपी अनिल माने, गटविकास अधिकारी वाय. डी.शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,कोषाध्यक्ष आशाताई रंधे,विश्वस्त राहुल रंधे,नगरसेवक रोहित रंधे यांनी निधीची तरदूत केली.यासाठी कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

Copy