किलबिल शाळेत शिक्षक सहविचार सभा

0

जळगाव : केसीई सोसायटी संचलीत किलबिल शाळेत बालकवर्गासाठी ‘गृहकृत्य हाच गृहपाठ’, ‘गटवार गृहकृत्य व त्यांनी शैक्षणिक उद्दिष्ट’ हे दोन शैक्षणिक उपक्रम सुरु केले आहे. या उपक्रमासंबंधी माहिती देण्यासाठी किलबिल शाळेत शिक्षक पालक सहविचार सभा घेण्यात आली. सहविचार सभेत गृहकृत्यासंबंधीची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून संस्थेचे शिक्षक समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापक मंजूषा चौधरी, हे भावनगर भागातील पालकांची सभा घेणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. किलबिल शाळेत झालेल्या शिक्षक पालक सहविचार सभेत भंडारी यांनी ही माहिती दिली. सभेत द्वितीय सत्रातील सहल, स्नेहसंमलेन व क्रीडा स्पर्धा संबंधी चर्चा झाली.

‘गृहकृत्य हाच गृहपाठ’ समजावले
चिमुकल्यांचं बालपण, शाळेतील जीवन हे आनंदात उत्साहात आणि प्रेमात न्हाऊन निघावयाच असेल, त्यांची प्रगती व्हायची असेल तर विविध शैक्षणिक प्रयोग शाळेत व्हायला हवे. त्यांची माहिती सर्व पालकांपर्यत केली पाहिजे. त्याचसाठी ‘गृहकृत्य हाच गृहपाठ’ हा उपक्रम समजावून सांगणार आहोत. यावेळी या सभेत द्वितीय सत्रातील सहली, स्नेहसंमेलन व क्रिडास्पर्धांसंबंधी चर्चा करण्यात आली.