किराणा दुकान फोडणारा पाचवा पोलिसांच्या ताब्यात

0

चाळीसगाव। शहरातील भीम नगर परिसरातील किराणा दुकान फोडणार्‍या चार आरोपींपना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यातील फरार असलेल्या एका अल्पवईन आरोपीस 6 एप्रिल 2017 रोजी चाळीसगाव शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्या पाच आरोपींना गुरूवारी 6 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता 4 आरोपींना 15 दिवसांची न्यायालईन कोठडी सुनावण्यात आली. तसेच आरोपी अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. 23 ते 24 मार्चच्या मध्यरात्री किराणा दुकानाचे कुलूप तोडून रोख रकमेसह 15 हजार रुपये किमतीचा किराणा मला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.

पोलीसांची गृप्त कारवाईनुसार केली अटक
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव वाल्मिकनगर मधील 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यातील 1 आरोपी फरार होता. फरार आरोपी सागर गणेश गुजराथी (वय-17, रा. वाल्मिक नगर)चाळीसगाव हा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन हवालदार शशीकांत पाटील, मिलींद शिंदे, पोलिस कॉस्टेबल राहुल पाटील, नरेंद्र नरवाडे यांनी त्यास त्याचे घाराजवळुन 6 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10ः30 वाजता अटक केली आहे त्याचे सह अटक असलेल्या ईतर 4 आरोपींना न्यायालयात हजऱ केले असता 4 आरोपींना 15 दिवसांची न्यायालईन कोठडी सुनावण्यात आली असुन त्या अल्पवईन आरोपीस बालसुधार गृहात पाठवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तपासी अमलदार शशीकांत पाटील यांनी दिली आहे.