किरण पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार!

0

जळगाव । शहरातील भगीरथ इंग्लिश स्कूलचे शिक्षक किरण पाटील यांना मानवसेवा विकास फाउंडेशन अमरावती यांच्यातर्फे मंबई येथे राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सम्मानित करण्यात आले. यात शेगावीचा राणा चित्रपटातील कलाकार मुकुंदजी वसुले, मुंबई विभागाचे ओ.एस.डी संतोषजी राउत, मराठी नाटीका व चित्रपटातील तारीका पदमा, ज्युनियर शत्रुध्न सिन्हा, गर्जा महाराष्ट् चॅनेलचे संचालक अनिल महाजन यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, अभिलेखा स्वरूप मानपत्र, महापुरूषांचे चरित्रग्रंथ,शाल, श्रीफळ, पुष्प देवून किरण पाटील यांना सम्मानित करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थापक डॉ. नंदकिशोर पाटील, महाराष्ट् राज्य मानव विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा राखी रासकर, वर्षा देशमुख, विजय वैती, विनोद पाटील, अवकाश जाधव, किशोरानंदजी देशमुख, पदमा कुलकर्णी, गुणवंत बाबा चित्रपटातील मुख्य भुमिका केलेले कलावंत विजय खंडारे, पंकज गुर्जर, मंगला बारी आदी उपस्थित होते. त्यांनी किरण पाटील यांचे कौतूक व अभिनंदन केले. शाळेतील गुणवंत शिक्षक व संपूर्ण महाराष्ट्रात शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल मुख्यध्यापिका आशा चौधरी, उपमुख्याध्यापिका नेहा जोशी, किशोर राजे, एस. डी. भिरूड आदींनी अभिनंदन केले.