Private Advt

किरकोळ वादातून महिलेसह मुलींना मारहाण : चौकडी जाळ्यात

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे किरकोळ वादातून महिलेसह मुलींना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी चौघा संशयीतांना अटक करण्यात आली.

चौघा संशयीतांना अटक
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कविता सोनवणे या अंगणात झाडू मारत असतांना त्यांची मुलगी, नात व मुलाला त्यांच्या शेजारी राहणारे चार जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना 25 फेब्रुवारी सकाळी सात वाजता रोजी घडली होती. याप्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयीत पसार होते. यातील संशयीत तुषार विलास कोळी (19) व सचिन नारायण कोळी (23), रा.कुसुंबा) यांना गावातून ताब्यात घेण्यात आले तर रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (36) व प्रवीण शांताराम कोळी (40) यांना पोलिस कोठडीचा हक्क राखून ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गफूर तडवी, सिध्देश्वर डापकर, अतुल पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील, नाना तायडे, गोविंदा पाटील यांनी केली.