किरकोळ भांडणात जमिनीवर पडल्याने 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

A 40-year-old woman died after falling to the ground in a petty fight शिरपूर : नातेवाईकांमध्ये किरकोळ भांडण सुरू असताना त्यात 40 वर्षीय महिला जमिनीवर पडल्याने तिचा मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील चिलारे गावात ही घटना घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सायाबाई नारसिंग पावरा (40, रा.चिलारे) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली.

डॉक्टरांनी मृत केले घोषित
वॉर्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार मंगळवारी रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास चिलारे येथे नातेवाईकांचे भांडण सुरू असतांना त्यात सायाबाई नारसिंग पावरा ही जमिनीवर फेकली गेली असता जखमी झाली. या महिलेस दिर अशोक रामसिंग पावरा याने बुधवार, 21 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास शिरपुर येथे कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. अमोल जैन यांनी तिला तपासुन मयत घोषित केले. .