किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण : डांभूर्णीच्या पाच जणांविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सतत खुनशी नजरेने का पाहतो? असे विचारताच पाच जणांनी 28 वर्षीय तरुणाला मारहाण केली. याप्रकरणी यावल पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ कारणावरून केली मारहाण
डांभूर्णी येथील विजय सुखदेव ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार दिवसांपूर्वी त्यांच्या घराला पाणी येत नव्हते. यामुळे त्यांची पत्नी हनुमान मंदिराच्या नळावर पाणी घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी काही जणांनी त्यांना पाणी भरण्यास विरोध केला होता. त्यावरून झालेले वाद मिटले होते मात्र, याच कारणावरून फिर्यादी ठाकरे यांच्याकडे खुनशी नजरेने काही तरुण पाहत होते. याचा जाब विचारल्यावर पंकज पंढरीनाथ कोळी, विवेक ज्ञानेश्वर कोळी, जीवन वासुदेव कोळी, सुनील निराधार कोळी व मनोज पंढरीनाथ कोळी (सर्व रा.डांभुर्णी) यांनी शिविगाळ व मारहाण केली. त्यात जखमी विजय ठाकरे यांना ग्रामस्थांनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी यावल पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.