Private Advt

किरकोळ कारणावरून तरुणाला जळगावात मारहाण

जळगाव : एका कंपनीतील मजूर दुसर्‍या कंपनीत पळविण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर तरुणास मारहाण करण्यात आली. ही घटना जळगाव शहरातील एमआयडीसीमधील जी सेक्टरजवळ घडली. या प्रकरणी मंगळवार, 12 एप्रिल रोजी एका जणाविरुध्द एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील अयोध्यानगरातील अरुण लक्ष्मण काकडे यांचा भाऊ विकास काकडे यांची एमआयडीसीत कंपनी आहे. दिलशान आलम (रा.रचना कॉलनी) हा काकडे यांच्या कंपनीतील मजूर दुसरीकडे घेऊन जात असल्याची माहिती अरुण काकडे यांना मिळाली. सोमवार, 11 एप्रिल रोजी अरुण काकडे यांनी एमआयडीसी जी.सेक्टरजवळ दिलशान आलम याला याबाबतचा जाब विचारला त्यावर दिलशान आलम याने अरुण काकडे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. अरुण काकडे यांचा भाऊ विकास हा समजविण्यास आला असता त्यालाही दिलशान याने शिवीगाळ केली. याबाबत अरुण काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलशान आलम याच्याविरोधात मंगळवार, 12 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील करीत आहेत.