किम जोंग उन २० दिवसांनंतर जगासमोर

0

प्योंगयांग: उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र शुक्रवारी ते जगासमोर आले. ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची बातमी उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन सुनचिओनमध्ये एका खतं निर्मिती करणार्‍या कारखान्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगपासून जवळ आहे. यावेळी किम यांची बहिणदेखील उपस्थित होती. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. तर किम यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती उत्तर कोरिया प्रशासनाकडून देण्यात येत होती. मात्र किम गेल्या २० दिवसांपासून जगासमोर न आल्यानं त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला.

Copy