किन्हीत 700 लीटर गावठीचे रसायन नष्ट : एकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही शिवारात.देवराम पाटील यांच्या शेताजवळील नाल्यात इरफान हसन गवळी (रा.कन्हाळा) हा गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना तालुका पोलिसांनी कारवाई करीत नऊ ड्रममधील 66 हजार 250 रुपये किंमतीची एक हजार 700 लिटर रसायण नष्ट केले तसेच 25 लीटर गावठी दारू जप्त केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, संदीप बडगे, शिवाजी खंडारे, होमगार्ड उमेश सोनवणे गोपाळ पवार आदींच्या पथकाने केली.