किनोदला शेतात काम करतांना 15 वर्षीय मुलीचा शॉक लागून मृत्यू

0

जळगाव : शेतात गहू वेचण्याचे काम करतांना शेतातून गेलेल्या वीजतारांच्या जोरदार प्रवाहामुळे विजेच्या जोरदार धक्कयाने महेक रफीकशेख वय 15 रा. किनोद या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रफीकशेख यांचे किनोद गावाबाहेर तापीनदीकडे जाणार्‍या रस्त्याकडे स्वतःच्या मालकीचे शेत आहे. या शेतात रफीकशेख पत्नी व मुलांसह गहू वेचण्याचे काम करत होते.
मुलगी महेक गहू वेचत असतांना अचानक उभी राहिली. जमीनीपासून काही उंचीवर असलेल्या वीजतारांमुळे महेकला जोरदार धक्का बसला. रफीकशेख यांनी तत्काळ
खाजगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविले. कोरोना रुग्णालय घोषित असल्याने त्यांना डॉ. उल्हास पाटील या रुग्णालयात उपचारार्थ जात असतांना वाटेतच महेकची प्राणज्योत मालवली. किनोद येथील पोलीस पाटील संदीप चव्हाण यांनी प्रकार तालुका पोलीस ठाण्यात कळविला. त्यानुसार पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात डॉ. कोमल पटेल यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास शामकांत बोरसे करीत आहेत. महेकच्या पश्‍चात आई, वडील भाऊ व बहिण असा परिवार आहे.