किनोदला कुटुंब झोपले असतानाच चोरट्यांचा लाखांच्या ऐवजावर डल्ला

भुसावळ/जळगाव :जळगाव तालुक्यातील किनोद येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कुटूंंबातील सदस्य झोपले असतानाच सोन्याचे दागिने व रोकड मिळून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुटुंब झोपले असतानाच झाली चोरी
मंगलेश्वर दिनकर पाटील (32, रा.किनोद, ता.जि.जळगाव) हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 12 जानेवारी रोजी ते कुटुंबियांसह जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरुवार, 13 जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. या प्रकरणी मंगलेश्वर पाटील यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार बापू पाटील करीत आहे.

 

Copy