किनगावात शॉर्ट सर्किटने किराणा दुकानाला आग ; 10 लाखांचे नुकसान

0

यावल- तालुक्यातील किनगाव येथे मुख्य चौकातील साईबाबा किराणा दुकानाला आग लागून सुमारे 10 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. दुकानाचे संचालक आकाश देशमुख यांनी शुक्रवारी दिवसभराचा व्यवहारानंतर रात्री 10 वाजता दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्री नंतर दीड वाजेच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. देशमुख यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने पहाटे चार वाजेच्या सुमारास आग नियत्रंणात आणली मात्र तोपर्यंत दुकानातील सुमारे 10 लाखांचे किराणा साहित्य जळून खाक झाले. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आल्याने दुकानाला लागून रहिवासी वस्ती, कापड दुकानाला झळ बसली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आगीची माहिती मिळताच चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकात सोनवणे, माजी आमदार रमेश चौधरी, सरपंच भूषण पाटील, उपसरपंच राजु पिंजारी, विनोद देशमुख, रोहिदास महाजन, गोटू सोनवणे यांनी नुकसानाची पाहणी केली.

Copy