किनगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीला अटक

यावल : तालुक्यातील किनगाव येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातील एकाने विनयभंग केला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवार, 7 रोजी घडली. संशयीत आरोपीला पोलिसांनी अटक केली. किनगाव येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी गावाचा आठवडे बाजार असल्याने ती आई सोबत बाजारात होती. साडेपाच वाजेच्या सुमारास गावातील रहिवासी राहुल बाळू पवार याने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडीत अल्पवयीन मुलीने यावल पोलिस स्टेशन गाठत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला राहुल पवार यास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.