किनगावातील तरुणाची आत्महत्या : कुटुंबियांचे नोंदवले जवाब

यावल : कौटुंबिक कलहातून त्रस्त झालेल्या किनगावातील तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाच्या अंत्यविधीला पत्नीने पाठ फिरवल्याची बाब समोर आली आहे तर दुसरीकडे यावल पोलिसांकडून मयत विवाहित तरणाच्या कुंटुंबींयाचे बुधवारी जाब-जवाब नोंदवण्यात आले. दरम्यान, एक्सपर्ट अ‍ॅडव्हाईज घेवून पुढील कारवाई करणार असल्याचे यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले. किनगावातील तुषार गोपाळ राणे (32) या तरूणाच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबातील आई आशाबाई राणे, भाऊ बाळु राणे, बहिण ज्योती सह काही जणांचे जाब-जवाब घेण्यात आल.े यात मयत तुषार राणे यांची पत्नी रत्ना तुषार राणे यांच्यातील वाद व तिच्याकडून न्यायालयात करण्यात आलेल्या केसेस तसेच ती सतत किनगावात येवून सोबत विविध संघटनांचे पदाधिकार्‍यांकडून मयत तुषार राणे यास धमकावत होती व यातुन प्रचंड तणावात तुषार होता, असे आई, भाऊ,सह बहिण यांनी आपल्या जबाबत म्हटले आहे. दरम्यान, पतीने आत्महत्या केल्यानंतर त्याच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यविधी केला जाईल, अशी माहिती मयत तुषार यांच्या पत्नी रत्ना व तिच्या कुटुंबांस देण्यात आली होती मात्र, पतीच्या अंतयात्रा व अंतिम दर्शनासाठी देखील पत्नी रत्ना आली नाही, असे राणे कुटुंबीयांनी सांगितले.