किनगावसह जळगावातील दुचाकी चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0

जळगाव/यावल : दुचाकी चोरट्यांच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून चौघांना अटक करण्यात यश आले आहे. तीन संशयीत जळगाव येथील असून एक संशयीत यावल तालुक्यातील किनगाव गावातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दुचाकी चोरट्यांसह चोरीच्या दुचाकी विकत घेणार्‍यांना यात आरोपी करण्यात आले आहे. सागर सुपडू कोळी (रा.नायगाव, ता.यावल) या आरोपीविरुद्ध यापूर्वी अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होते शिवाय आरोपी पैशांची कुठलाही कामधंदा करीत नसताना पैशांची उधळपट्टी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाला मिळाली होती शिवाय आरोपी आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे याच्या ताब्यात चोरीच्या दुचाकी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

चोरीच्या पाच दुचाकी जप्त
आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे याला (22, रथचौक, कोळीपेठ, जळगाव) यास एका चोरीच्या दुचाकी प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आरोपीच्या चौकशीत पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीने यावल तालुक्यातुन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून दुचाकी चोरी प्रकरणात सागर उर्फ साबु सुपडू कोळी (रा.किनगाव), सुदर्शन शांताराम मोरे (रा.मेहरून, जळगाव) व दीपक बाबुलाल खांदे (रा. अयोध्या नगर, जळगाव) यांचाही सहभाग असवल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. आरोपींना यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, हवालदार संजय तायडे, सुनील तायडे आदी करीत आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, दत्तात्रय बडगुजर, उमेश गिरीगोसावी, राजेंद्र पवार, मुरलीधर बारी आदींच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Copy