किनगावच्या तरुणाचा कटरमध्ये पाय कापला गेल्याने मृत्यू

यावल : कटर मशीनवर काम करतांना पाय कापले गेल्याने जखमी झालेल्या तरुणास जळगावात उपचारासाठी दाखल केले होते असता उपचारादरम्यान तरुणाचा शनिवारी मृत्यू झाला. सोपान शंकर मिस्त्री (35, रा.चौधरीवाडा, किनगाव) असे मयताचे नाव आहे. किनगाव येथे शनिवारी सकाळी कटर मशीनवर सोपान मिस्त्री हा तरुण काम करीत करीत असताना त्याचा उजवा पाय कटर मशिनीत आल्याने त्याच्या किनगाव प्राथमिक केंद्रात डॉ.मनिषा महाजन यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयात हलवण्यात सल्ला दिला. तरुणावर जळगाव महाविद्यालयात उपचार सुरू असतानाच काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मयताच्या पश्‍चात मोठा भाऊ व तीन बहिणी आहेत. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.