किडस् गुरुकुल स्कुलच्या प्राचार्यांचे घर फोडले ; रोकडसह सात लाखांचा ऐवज लांबविला

3

जळगाव : गेल्या महिनाभरापासुन घर बंद करुन किडस् गुरुकुल स्कूल येथे कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या स्कुलच्या प्राचार्या मीनल संतोष जैन यांच्या दौलत नगरातील बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी साडे पाच लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये रोख व काही नकली दागिने असा सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

मंगळवारी सकाळी शेजारी राहणारे गजानन चावदस मराठे यांनी मोबाईलवर संपर्क घरुन घराचे कुलुप व कडी कोंयडा तुटल्याची माहिती जैन यांना दिली. त्यानुसार त्यांनी सकाळी घरी येऊन पाहिले असता घरात चोरीचा प्रकार समोर आला. चोरट्यांनी कपाट, बेडमधील दागिने, रोेख रक्कम, नकली दागिने, महत्वाचे कागदपत्रे लांबविल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक, एलसीबीच्या पथकासह श्वान पथकाची घटनास्थळाला भेट दिली असुन चोरट्यांच्या शोधार्थ यंत्रणा कामाला लागली आहे.

Copy