किंग्ज पंजाबचा रायझिंग पुण्यावर विजय

0

इंदूर। पंजाब विरूध्द पुणे सुपरजायंटस हा सामना चांगला रंगणार असे वाटत असतांना पंजाबाचा कर्णधार मॅक्सवेलने कर्णधार पदाला साजेशी फलंदाजी करून आपल्या संघासाठी पहिला विजय मिळविला.तो ही ज्या संघाने आपला आयपीएलचा पहिला सामना जिकला होता.त्या संघाचा संघाचा पराभव करून.दोन्ही संघाच्या खेळाची सुरवात ही चांगली झाली नाही. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने पुण्यावर 6 विकेट्स राखून मात केली. आघाडीचे चार फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्यावर मॅक्सवेलने डेव्हिड मिलरच्या साथीने अभेद्य 79 धावांची भागीदारी कर पंजाबला विजय मिळवून दिला. 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. मनन व्होरा (14), वृद्धिमान साहा (14), हाशिम आमला (28) आणि अक्षर पटेल (24) हे झटपट बाद झाल्याने पंजाबची अवस्था 4 बाद 84 अशी झाली. मात्र ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 44) आणि डेव्हिड मिलर (नाबाद 30) यांनी पंजाबला सहजपणे विजय मिळवून दिला.

पुणे संघाची फलंदाजी —
पुण्याची या सामन्याची सुरूवात डळमळीत झाली.या मोसमाची सुरूवात चांगली करणार्‍या पुण्याची आजच्या मॅचमधली डगमगती सुरूवात पाहिल्यावर पुण्याचा डाव शंभरच्या आता आटपतो की काय असे वाटत होते. पुणे संघाला पहिला झटका बसला तो मयंक अगरवाल रूपात बसला.सलामीवीर मयांक हा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार स्मिथ आणि रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे 19, तर स्मिथ 26 धावांवर बाद झाले. फटकेबाजी सुरू असतांनाही दुसर्‍या बाजुला गडी बाद होत होते. धोनी आज आपल्या फलंदाजीची जादू दाखविल असे वाटत असतांना 11 चेंडूत पाच धावा काढून तो बाद झाला. पण नंतर बेन स्टोक्सने तिवारीच्या साथीने तुफान फटकेबाजी करत पुण्याचा डाव सावरला. बेन स्टोक्स आऊट झाल्यावर पिचवर आलेल्या ख्रिस्तियननेही फटकेबाजी चालू ठेवली पण पुण्याच्या मधल्या फळीने चांगली कामगिरी करत पुण्याचा सावरला. बेन स्टोक्स आणि मनोज तिवारी यांच्या फटकेबाजीच्या बळावर पुणे संघाने पंजाबसमोर 164 धावांचे आव्हान ठेवले आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स (50) आणि मनोज तिवारी (40) यांच्या फटकेबाजीच्या बळावर 163 धावांपर्यंत मजल मारली.

पंजाब किग्ज इलेव्हनची फलंदाजी
रायझिंग पुणे सुपरजायंटसने संघाने पंजाब किंग्ज संघाने 163 धावाचे आव्हान दिले होते.या धावांचा पाठलाग करतांना पंजाब संघाची सुरूवात पाहिजे तशी दमदार झाली नाही.पंजाब संघाची धावसंख्या 27 असतांना संघाचा सलामीवीर मयांक तंबूत परत गेला. यानंतर फलंदाजीला आलेल्या वृध्दिमान साहाला इमरान ताहिरने आपल्या स्पिनची जादू दाखवित त्याला क्लीनबोल्ड केले त्यावेळेस संघाची धावसंख्या 49-2 होती.यानंतर आलेल्या हाशिम अमला याने फलंदाजीला जोरदार सुरवात केली.तो वैयक्तिक 38 धावावर असतांना बाद झाला.संघाची धावसंख्या 85 वर असतांना अक्षर पटेल रूपात पंजाबचा चौथा गडी बाद झाला. 85 वर चार गडी बाद झाले असतांना ग्लेन मैक्सवेल व डेव्हिड मिलर खेळत होते.दोन्ही जणांनी चांगली फलंदाजी करित 79 धावाची भागीदारी करून पंजाब संघाला पहिला विजय मिळवून दिला.त्यात मैक्सवेल याने 20 चेडूत 44 धावात केल्या त्याने 4 षटकार लावले.तर मिलरने 27 चेडूत 30 केल्यात त्यात 2 षटकार लावले.मैक्सवेलच्या कर्णधारच्या पारीमुळे पंजाबने पुणे विरूध्दचा सामना जिकला. पंजाबने 6 गडी आणि एक ओव्हर राखत सामना जिंकला.

जाधवचे अर्ध शतक
आयपीएलमधील 5 वा सामना दिल्ली डेयरडेव्हिल्स व रॉयल चॅलेजर बैगलूरू यांच्यात आयपीएलचा दुसरा सामना रात्री 8 वाजेला सुरू झाला. आरसीबीने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबीकडून सलामीकरण्यासाठी क्रिस गेल्स व शेन वॉटसन हे खेळण्यास मैदानावर आले.त्यांनी मैदानावर पहिल्या चेडू पासून आपण आज जोरदार फटके बाजी करणार असे संकेत देण्यास सुरवात केली .वॉटसन याने धुव्वाधार फलंदाजीला सुरवात केली. संघाची धावसंख्य 26 वर असतांना क्रिस ग्लेस यांल 6 धावावर उत्कृष्ट झेल घेत बाद केले.त्यांनतर मनदिपसिंग याला 12 धवावर बाद झाला.41 धावा संख्येवर 2 गडीबाद झाले होते.मात्र यानंतर संघाची धाव संख्या 55 वर असतांना आरसीबीला तिसरा झटका वॉटसनच्या रूपात मिळला.षक पंत याने वॉटसन याला यष्टीचित करण्यात कोणतीही चूक केली नाही. 142 धाव संख्येवर 5 गडी बाद असा आरसीबीची धावसंख्या होती. बेन्नी हा 16 धावांवर बाद तर केदार जाधव हा 68 धावांवर खेळत होता. जाधवने आपल्या पारित 5 षटकार तर 4 चौकार लावले होते. विनोद हा 2 धावांवर खेळत होता.