कासोदा येथे भाजपा कार्यकर्ता मेळावा

0

कासोदा । येथे जि.प. व पं.स. निवडणुकीसंदर्भात कासोदा- आडगांव जि.प. गटाचा कार्यकर्ता मेळावा श्रीराम मंदिरात पार पडला. या प्रसंगी शिवसेना, रा.काँ. मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचा सत्कार खासदार ए.टी. पाटील, तालुकाध्यक्ष एस.आर. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार ए.टी. पाटील होते. प्रास्ताविक शहराध्यक्ष माजी सरपंच संजय चौधरी यांनी केले.

खासदार ए.टी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात पक्षाचे ध्येय धोरण सांगितले. व शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धोरण आखले असल्याची माहिती दिली. विरोधकांनी कितीही टीका केली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे कारण जितके काम आपले चांगले तितकीच जास्त टीका विरोधक करतात. आपल्या डोळ्यासमोर निवडणूक ठेवा व आतापासून कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. एस.आर. पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जि.प. साठी मच्छिंद्र पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. जि. प. गटात तीव्र पाणीच्या काळात मच्छिंद्र पाटील यांनी नागरिकांना टँकरने पाणी दिले. शेतकर्‍यांचे पाटचार्‍यां, जी.सी.पी स्वत:च्या खर्चाने तयार करून दिले. नागरिकांना सहकार्य करण्यासाठी ज्याचा हात नेहमी खुला आहे. जनता त्यांना निवडून देईल अशी आशा व्यक्त केली. जि.प. सदस्य मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले की, मी सेवा करणारा तुमचा सेवक आहे. 80 टक्के समाजसेवा व 20 टक्के राजकारण करतो. तुम्ही मला पुनश्‍च निवडून दिले तर अपूर्ण राहिलेली कामे मी निश्‍चित करेल अशी ग्वाही दिली. नुरुद्दीन मुल्लाजी, नरेंद्र पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन पानपाटील यांनी केले. आभार नरेश ठाकरे यांनी मानले. मेळाव्याला कासोदा – आडगाव गटातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.