कासोदा येथे पाणी पुरवठा योजनेस मंजुरी

0

जळगाव । मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नळ पाणी पुरवठा योजनेला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. सदर योजनेच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नाशिक यांचे तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आले आहे.

11 कोटी 7 लाख 807 इतका निधी
प्रस्तावनेत नमूद केलेल्या वस्तुस्थितीचा विचार करता मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत कासोदा या गावाला नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 11 कोटी 7 लाख 807 इतका निधीस मान्यता देण्यात आली आहे. योजनेची आदेश पाणी पुरवठा विभागातील कक्ष अधिकारी साबणे यांना प्राप्त झाले आहे. नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांचे पती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी साबणे यांचे स्वागत केले. प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीची बैठक 6 फेबु्रवारी रोजी घेण्यात आली होती. यात योजनेच्या अहवालास मंजुरी देण्यात आले. राज्यात 2016-17 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दहा योजनेकरीता 110 कोटी 5 लाखाचा निधी मंजुर आहे.