कासोदा आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकेकडून मास्क वाटप

0

एरंडोल: सध्या सर्वत्र करोना कहर वाढलेला आहे. याचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन व प्रशासन आपल्या स्तरावर विविध उपाय योजना करीत आहेत.

मंगळवारी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका शोभा पाटील यांनी मास्क वाटप केले तसेच कासोदा, एरंडोल प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी,आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, कोरोना दक्षता समिती, व जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी स्वखर्चाने हात रुमालाचे मास्क करून वाटप केले. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे पूर्णपणे पालन करण्यात आले. काही सदस्यांनी घरपोच प्रत्यक्ष जाऊन मास्कचे वाटप केले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Copy