Private Advt

कासारखेडा गावात एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या

यावल : तालुक्यातील कासारखेडा येथे शनिवारी मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. मंदिरासह दुकान व दोन बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट केले असून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची भीती आहे. घरातील रहिवासी गावावरून आल्यानंतर चोरी झालेल्या नेमक्या मुद्देमालाची माहिती कळणार आहे.

एकाचवेळी चार ठिकाणी घरफोड्या
कासारखेडा, ता.यावल येथील निंबा पुना कुंभार व सुकलाल मिस्त्री हे कुटुंबासह घराला कुलूप लावुन बाहेर गावी गेले असून रविवारी सकाळी ग्रामस्थांना त्यांच्या घराचे दरवाजे उघडे दिसले व पाहणी अंती त्यांच्या घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले शिवाय गावातील श्री तुकाराम महाराज मंदिरातील दानपेटी फोडलेल्या अवस्थेत दिसून आली व मोना इलेक्ट्रॉनिक या दुकानात देखील चोरी झाल्याचे उघड झाले. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले, गणेश ढाकणे, संदीप सूर्यवंशी, रोहिल गणेश पथकासह दाखल झाले व चार ही ठिकाणी पाहणी करण्यात आली.