कासव्यात दोन गटात तुंबळ हाणामारी : 11 जणांविरुद्ध गुन्हा

फैजपूर : जवळच असलेल्या कासवा, ता.यावल येथे बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेप्रकरणी 11 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर हाणामारीत लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याने चौघे जखमी झाले.

किरकोळ कारणावरून उफाळले भांडण
बुधवारी रात्री कासवा गावात किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत फिर्यादी पवन पंढरी कोळी, पंढरी बारकु कोळी, बापू शांताराम सपकाळे, मनकरीनाका बाई रमेश तायडे हे चार जण जखमी झाले. या घटने प्रकरणी पवन कोळी यांनी फिर्याद दिल्यावरून विनोद सपकाळे, सोपान सपकाळे, जगदीश सपकाळे, विकास सपकाळे, जितू सापकाळे, ललित सपकाळे, संजय सपकाळे, कमलाकर सपकाळे, लहू सपकाळे, सुकदेव सपकाळे व भूषण सपकाळे (सर्व रा.कासवा) यांच्या विरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकारी करीत आहे.