काश्मीरप्रश्‍नावरुन तालिबानचा पाकिस्तानला झटका

0

नवी दिल्ली – काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. हे सर्व दावे तालिबानने फेटाळून लावले आहेत. काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्ये अजिबात सहभागी होणार नाही. दुसर्‍या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करणार नाही असे तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबानची ही भूमिका पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे.

तालिबान काश्मीरमधल्या जिहादमध्ये सहभागी होणार, हे मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुसर्‍या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने सांगितले.