काश्मीरची ढाल करून पाकिस्तान भारताला उकसवतोय?

0

मुंबई । काश्मीरमधील भारतीय लष्करांच्या तळावर घुसघोर दहशतवाद्यांच्या माध्यमातून हल्ले करणे. काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर दगडफेक करण्यासाठी चिथावणी देऊन काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करण्याचे प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचे हे लपून राहिलेले नाही. देशांतर्गत असलेल्या समस्यांवरून जनतेचे दुर्लक्ष व्हावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरच्या मुद्द्याला स्थान मिळवून देण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. पाकिस्तानच्या या कारवायांचा बदल घेण्याची मागणी आता देशात जोर धरू लागली आहे. त्यामुळे पाकिस्ताना नक्की पाहिजे तरी काय असा प्रश्‍न उपस्थित होतो. शेवटी पाकिस्तान भारताला आताच का उसकावतोय हादेखील प्रश्‍न आहे.

शरीफ सरकार अडचणीत आहे
1 जेव्हा पाकिस्तानातील सरकार अडचणीत येते तेव्हा सीमारेषेवर पाकिस्तानकडून तणाव निर्माण केला जातो. पनामा पेपर फुटी प्रकरणात नवाझ शरीफ अडचणीत आले आहे. न्यायालयात शरीफ सरकार बॅकफूटवर आहे. त्यामुळे भारत पाक सिमेवर तणाव निर्माण करुन शरीफ सरकारविरोधी पक्ष आणि पाकिस्तानी जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करत आहे.

अफगाण सीमेवर पाक सैन्य अडचणीत
2 अफगाण सीमेवर दहशतवाद्यांच्या गटावर कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरले आहे. त्यामुळे तिथून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर घातपात केले जात आहेत. अफगाण सिमेवर अमेरिकेनेही पाकिस्तानकडून पाठराखण होत असलेल्या दहशतवादी गटांवर कारवाया करण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे आपली अबू्र वाचण्यासाठी पाकिस्तानाती लष्करातील वरिष्ठ अधिकारी भारतीय सीमेवर तणाव निर्माण करत आहेत. पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बावजा यांनी मेंढर परिसराचा दौरा केल्यानंतर लगेचच एक दिवसाने पाक सैन्याने घुसखोरी केली.

पाकिस्तानविरोधकांचा आवाज वाढला
3 सध्याच्या परिस्थितीत बलुचिस्तान, गिलगीट आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. गिलगीट- बाल्टीस्तानमधील नेत्यांनी तर जनमत घेतल्यास भारताला साथ देणार असल्याचे म्हटले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकविरोधी आवाज ऐकायला येऊ लागले आहेत. बलुचिस्तानने तर स्वातंत्र्याचीच मागणी केली आहे. भारतानेही त्यांच्या या मागणीला उघडपणे समर्थन दिले आहे. त्यामुळे काश्मीर आणि सीमारेषेवर तणाव वाढवून भारताला त्यात गुंतवून ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.

चीनची फूस
4 अमेरिकेची साथ सोडून सध्या पाकिस्तान चीनशी मैत्री वाढवू पहात आहे. पाकिस्तानातून जाणार्‍या विशेष आर्थिक कॉरीडरमध्ये चीनने सुमारे 46 दशलक्श डॉलर्सची गुंतवणुक केली आहे. या आर्थिक कॅरिडोअरला भारताने जोरदार विरोध केला आहे. त्यात पाकिस्तानातील काही प्रातांमधूनही या कॅरिडोअरला तिव्र विरोध होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या भारताच्या मागणीला चीनने संयुक्त राष्ट्र संघात विरोध केला आहे. याशिवाय अरुणाचल आणि लडाखमध्ये भारताने चीनला जशास तसे उत्तर दिले होते. त्यामुळे चीनच्या सांगण्यावरुनही पाकिस्तान भारताविरुद्ध कारवाया करत असेल.

काश्मीर मुद्द्यावर लक्ष्य वेधण्यासाठी
5 मागील काही वर्षांपासून काश्मीरप्रश्‍नाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या काश्मीरी युवकांच्या मुद्दयावरुन पाकिस्तानने हा प्रश्‍न पुन्हा चर्चेत आणायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण करून त्याची जोड पाकिस्तान त्या प्रश्‍नाला देऊ शकते. पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांनी काश्मिरी फुटीरवाद्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे स्पष्ट केले होते.