काश्मिरी जनतेच्या नागरिक हक्कांसाठी एकदिवसीय धरणे !

0

जळगाव: कलम ३७० हटविण्यात आल्यापासून काश्मिरी जनतेमध्ये भीतीचे वातावरण असून सरकारकडून दडपशाही सुरु आहे. कलम ३७० हटवून १२५ दिवस झाले आहे. मात्र तेथील खरी परिस्थिती ही काय आहे? हे जनतेसमोर येऊ दिले जात नसल्याने लोकशाही नागरी मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. काश्मिरी जनतेच्या मुलभूत नागरी हक्कावर सरकार गदा आणत असल्याने यावेळी मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

कलम ३७० हटविल्यापासून बाहेरून काश्मीरमध्ये कोणालाही जाता येत नाही. इंटरनेट सेवा बंद आहे. खरी परिस्थिती जनतेसमोर येऊ दिली जात नाही. पत्रकारांना देखील खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यास मज्जाव केले जात असल्याचे आरोप करण्यात येत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Copy