कावठी येथील 14 वर्षीय मुलीचा विनयभंग

0

धुळे । तालुक्यातील कावठी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मोबाईलमध्ये फोटो काढून त्यात छेडछाड करुन मुलीच्या गळ्यात हात घातलेला फोटो तयार करुन तो तिला दाखवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कावठी, ता.धुळे येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या गावातील मुकेश विठ्ठल सोनवणे (26) या तरुणाने केव्हातरी मुलीचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले व त्या फोटोत छेडछाड करुन त्याचा हात तिच्या गळ्यात असल्याचे स्वरुप देऊन वेळोवेळी मुलीच्या जवळ येऊन तो फोटो तिला दाखवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न विनयभंग केला. त्यानुसार, मुकेश सोनवणेविरुध्द लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.28 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कावठी गावात मुलीच्या घरासमोर अंगणात घडली.