काळ्या हळदीच्या बहाण्याने मुंबईच्या युवकाची फसवणूक

मुक्ताईनगर : मुंबईतील युवकाला काळी हळद देण्याच्या बहाण्याने बोलावून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. सचिन अंजुर पवार (हलखेडा) व सागर अंबादास गंगातीरे (कुर्‍हा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांना सुगावा लागताच आरोपींना अटक
मुंबईतील चेंबूर भागातील रहिवासी सुनील सखाराम गायकवाड यांना संशयीत आरोपींनी 25 मे रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर यु ट्युबवरील काळ्या हळदीचा व्हिडिओ पाठवून ही काळी हळद गळ्यात लावल्यास तुमचे नुकसान होणार नाही, आर्थिक भरभराट होईल असे खोटेनाटे सांगून त्यास एक पाव हळदीसाठी 50 हजार रुपये घेऊन मुक्ताईनगरच्या बोदवड चौफुलीवरील पुलाखाली बोलावले व 50 हजार रुपये दे आमचा माणूस हळद घेऊन येत आहे, असे सांगितले मात्र या गोष्टीचा सुगावा पोलिसांना लागताच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहेत.

Copy