काळीपिवळीची झाडाला धडक, 12 जखमी

0

शिरपूर। शिरपूर शहरालगत असलेल्या शहादा रोडवरील विठ्ठल लॉन्सलगत काल दि.12 रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास प्रवासी वाहतूक करणार्‍या काळीपिवळी गाडीने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघात चालकासह 12 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली.

शहादा येथुन शिरपुरकडे प्रवाशी घेवुन येणारी काळी पिवळी (क्रमांक एम एच 19/ 0162) ही शिरपूर शहरालगत असलेल्या विठ्ठल लॉन्स जवळ पोहचली असता अचानक गाडी चा टायर फुटल्याने चालकाचा गाङीवरील ताबा सुटला त्यामुळे गाडी एका झाङावर जाऊन आदळली. या अपघातात चालक लक्ष्मण पाटील,दिपक कोळी रा.चिरणे कदाणे ता.शिंदखेडा, विमलबाई कोळी (65), भटाबाई महाले, आप्पा हिरामण वाघ, जान्हवी यादव कोळी, प्रमिला सखाराम कोळी, सखाराम कोळी, किरण कोळी, नागो महेंद्र भील, सुरेश विक्रम भील हे जखमी झालेत. या अपघातात गाडीचा पुढील भाग पूर्णपणे दाबला गेला आहे. सर्व जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.