कार-टेम्पोच्या धडकेमध्ये दोघे गंभीर जखमी

0

हिंजवडी : भर रस्त्यात अंधारात टेम्पो पार्क केला. त्या टेम्पोला कारची धडक बसली. या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे शनिवारी झाला. सोमनाथ बिभीषण पवार (वय 27, रा. नवी मुंबई) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. किशोर राजेंद्र मगर (वय 27), मुकेश पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष कदम यांनी फिर्याद दिली आहे. टेम्पोचालक ईश्‍वर गोविंद संकपाळ (वय 30, रा. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एम एच 01 / सी आर 5349) चालक ईश्‍वर मुंबई-बेंगलोर महामार्गावरून जात होता. साई स्नॅक्स ताथवडे येथे आल्यानंतर त्याने टेम्पो रस्त्यावरच पार्क केला. टेम्पो पार्क केलेली जागा अंधारात होती, त्यामुळे दुरून त्या ठिकाणी काय आहे याचा अन्य वाहन चालकांना अंदाज येत नव्हता. दरम्यान मुंबईकडून पुण्याच्या दिशेला येत असलेली कार (एम एच 43 / बी जी 5431) टेम्पोला धडकली. या अपघातात कारचालक सोमनाथ पवार याचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोघेजण किशोर आणि मुकेश हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Copy