कार्यकर्त्यांच्या बळावर झेडपीवर झेंडा फडकावणार

0

चाळीसगाव । केंद्रात व राज्यात जनतेचं कल्याणकारी सरकार सतेवर आहे. त्यामुळे सामान्य नागरीक या सरकारवर खुश आहेत. या पार्श्‍वभूमीवर समविचारी नव्या कार्यकर्त्यांचा पक्षाकडे ओढा वाढतो आहे यामुळे जुन्या व नव्या कार्यकारयांच्या बळावर जळगांव जिल्हा परिषद व चाळीसगाव पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवू असा विश्वास यावेळी खासदार ए.टी.नाना पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते वाडीलाल राठोड, राष्ट्रीय सह शिक्षण संस्थेचे संचालक विश्‍वास चव्हाण, शेषराव बापु पाटील, तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, पं.स. सदस्य जगन्नाथ महाजन, धनंजय मांडोळे, दिनेश बोरसे, कपिल पाटील, शैलेंद्र ठाकरे, प्रभाकर चौधरी, विवेक चौधरी,अरुण पाटील टाकळी गंनप्रमुख सुभाष चौधरी,गटप्रमुख डॉ.रविंद्र मराठे, डॉ.प्रशांत एरंडे, भावराव पाटील, वडगांव लांब्याचे सरपंच मानसिंग राजपूत यांच्याप्रमुख उपस्थित होते.

मान्यवरांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
खासदार ए.टी.नाना पाटील पुढे म्हणाले, आमदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाचा सर्वांगीण विकास होत असल्याचा फायदा यापुढे तरवाडे गावाला देखील होणार आहे. ‘सबका साथ सबका विकास’ सर्वाना भावतो आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते भाजपाकडे आकर्षित होत आहेत. त्यांचा सन्मान करीत पक्ष येत्या निवणुकीत जीपवर भाजपचा झेंडा फडकणार आहे असा विश्‍वास खासदार पाटील यांची व्यक्त केला. यावेळी आमदार उन्मेश पाटील म्हणाले की, जामदा उजवा कालव्यातून पाटचारी तयार तरवाडे, खरजाई, न्हावे, ढोमने या गावांचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर विश्वास चव्हाण यांनी सांगितले की, सामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जाणार्‍या रवींद्र चौधरींचे प्रवेशाने या गटातील उमेदवार निश्चित विजयी होण्यास मदत होईल. प्रास्तविक के.बी.साळुंखे यांनी केले. ते म्हणाले की रवींद्र चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाने करगाव टाकळी प्र.चा. गटात पक्ष मजबूत होण्यास मदत झाली आहे.

सरपंचासह आदी पदाधिकारींनी केला भाजपात प्रवेश
माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र चौधरी व माजी सदस्या पुष्पाताई चौधरी यांनी तरवडे सरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमनसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या समवेत तरवाड्याच्या सरपंचा ज्योती गवळी, उपसरपंच निर्मला सोनवणे, रामभाऊ चौधरी, दिनकर जाधव, सुषमा महाडिंक निर्मलाबाई दरेकर, प्रमिला बागुल, अलकाबाई पाटील, मिनाबाई बेलकर यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हा.चेअरमन सकवारबाई पाटील, सदस्या नाना गवळी, परशराम वाणी, चिंधु वाणी, सुभाष कोळी, रविंद्र गायकवाड, लिलाबाई पवार, झेलाबाई चव्हाण, दिनकर पाटील, सचिन चौधरी,
दगडू लोहार, भावराव अहिरे,, बिलाखेड येथील जगन जाधव खरजई येथील माजी सरपंच सतिश मुलमुले, सुकदेव पाटील, गोपाल चौधरी, संदिप एरंडे, मधुकर एरंडे, श्रावण पाटील, शशिकांत एरंडे यांनी भाजपात प्रवेश केला.

अमळनेरात शिवसेनेची आढावा बैठक
अमळनेर । तालुक्यातील आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेन तर्फे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा दौर्‍यावर असलेले के.पी. नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी बोलतांना शिवसेना तालुक्यात स्वबळावर लढणार असुन काही इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती झाल्या आहेत. मात्र उमेदवारी उद्धव ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र मिर्लेकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे निश्चित करतील असे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष अनिल अंबर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजु मास्तर, शहर प्रमुख प्रताप शिंपी, शाखा प्रमुख मनिष पवार, विद्यार्थी सेना शहर प्रमुख आख्तर तेली मोठ्या संख्येन शिवसैनिक उपस्थित होते.