कार्पोरेटमधील आचारसंहिता कार्यशाळेतूनच मिळतात

0

जामनेर : कार्पोरेट जगात नोकरी मिळवितांना मुलाखतीला सामोरे कसे जावे, कसे बोलावे, कसे रहावे आदी बाबींच्या आचारसंहिता कार्यशाळेतूनच मिळतात, असे प्रतिपादन येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.व्ही.भास्कर यांनी केले. ग्लोबल बिझनेस फाऊंडेशन स्किल या विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जामनेर येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. शेंदुर्णी, बोदवड, नेरी, जामनेर येथील 300 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.

यांची होती उपस्थिती
कार्पोरेटमधील आचारसंहिता अशा कार्यशाळेतून मिळत गेल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात अडचण येवू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. जळगाव येथील सिलीकॉन व्हॅलीच्या प्रतिभा पाटील, उमवितील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलचे प्रमुख उमाकांत सोनवणे, अभियांत्रीकी महाविद्यालयाचे संदीप महाजन, प्रा.एस.एल.विसपुते, प्रा.आर.यु.जाधव, प्रा.ए.के.राऊत, प्रा.एम.टी.चौधरी, प्रा.अमेय लोहार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेंदुर्णी येथील माधूरी भदाणे, विशाखा उंटवाल या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आली. संचालन प्रा.ए.के.राऊत यांनी केले तर आभार प्रा.आर.डी.वाघ यांनी मानले.