कारागृहात प्रशासनाच्या दबंगगिरीबाबत कैद्याची चिठ्ठी

0

जळगाव: जिल्ह्यातील कारागृहात खून, दरोडा यासह विविध गुन्ह्यातील संशयीत आरोपी शिक्षा भोगत आहेत. यातच कारागृहात कैद्यांमध्ये होणारी हाणामारी असो की कैद्यांना अनेकमार्गाने पुरविले जाणारे अंमली पदार्थ असो त्यामुळे जिल्हा कारागृह नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. कारागृहातून एकाचवेळी तीन कैदी पलायनाची घटना ताजी असतांनाच दोन दिवसांपूर्वी संशयित रविंद्र उर्फ चिन्या रमेश जगताप वय 34 याचा कारागृह अधीक्षकांसह कर्मचार्‍यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूच्या आरोपाने खळबळ उडवून दिली. या घटनेच्या निमित्ताने एक अज्ञात कैद्याने त्याच्या स्व हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी कारागृहाबाहेर चिन्याच्या नातेवाईकांना पाठवून कारागृहात कैद्यासोबत होत असलेल्या विविध प्रकाराबाबच्या घटनांचा खुलासा केला आहे. चिठ्ठीमुळे चिन्याचा मृत्यू खरच कारागृहात मारहाणीतच झाल्याची शंका उपस्थित होत आहे.

कारागृहातील प्रकरणांना वाचा फुटावी…
चिन्या उर्फ रविंद्र जगताप याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसह कुटुंबियांनी कारागृह अधीक्षकांसह कर्मचार्‍यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. तसेच इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करुन कारागृह अधीक्षकांवर खुनाचा दाखल करावा अशी मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले. चिन्या मृत्यूनंतर कारागृहात कैद्यांना कशाप्रकारे वागणुक दिली जातेय, कशाप्रकारे मारहाण केली जावून हातपाय फ्रॅक्चर केले जाताहेत, गोष्टींची बोंब फुटू नये म्हणून कारागृहातच त्याच्यावर उपचार केले जाताहेत, जेवण असो की इतर घटना याबाबत आवाज उठविला की त्या कैद्याची जेलबदली करुन देण्यात येत अशा आशयाची चिठ्ठली अज्ञात कैद्याने चिन्याच्या नातेवाईकांना पाठविली आहे. चिन्या नातेवाईकांच्या माध्यमातून याबाबत आवाज उठविला जावून प्रकरणाचा वाचा फुटावी, हा उद्देश कैद्याचा असावा असेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

न्यायालयाकडून चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी
मयत चिन्याचय नातेवाईकांच्या आरोपानंतर न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात येवून न्यायाधिशांच्या उपस्थिती इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र यानंतर कारागृह वरिष्ठ अधिकारी, महानिरिक्षकांनी याबाबत साधी चौकशी तसेच पाहणीही केली नसल्याची माहिती समोर येत आहे. कारागृहातील अनेक घटनांवर प्रशासनाकडून पदडा टाकण्याचे काम सुरु असल्याचहे कैद्याने पाठविलेल्या चिठ्ठीमुळे समोर येत असून काराृगहावर कारवाईचे अधिकार असलेल्या न्यायालयानेच चौकशी करुन नेमक खर काय, खोट काय याबाबत माहिती घ्यावी, जर यात कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी चिन्या उर्फ जगताप याच्या नातेवाईकांकडून होत आहे.

चिठ्ठीत कारागृहातील घटनांचा उल्लेख

चिन्याच्या मृत्यूझाला त्याच दिवशी कारागृहातून एक चिठ्ठी बाहेर आली आहे. या चिठ्ठीत कारागृहात घडलेल्या तीन घटनांची माहिती असून ती नेमकी कोणत्या कैद्याने पाठविली आणि कोणत्या उद्देशाने पाठविली. या प्रश्नांची उत्तरे सद्यस्थितीत अनुत्तरीत आहेत.

1 गेल्या पंधरा दिवसापुर्वी कारागृहात भुसावळमधील काल्या व त्याच्या मित्राला पोलिसांकडून मारहाण झाली आहे. यामध्ये काल्या व त्याचा मित्राचा हात व बोट फ्रॅक्चर देखील झाले आहे. परंतु ही घटना कारागृहाबाहेर येईल म्हणून पोलीसांनी त्यांच्यावर आतापर्यंत कुठलेही वैद्यकीय उपचार केले नसल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.आहे.
2 कारागृहात कैद्यांना दिले जाणारे निकृष्ठ दर्जाचे असल्याने नितीन पाटीलसह अकरा जणांनी जेवणासाठी अर्ज केला होता. त्यामुळे त्यांची जेल बदली करुन दिली आहे.
3 बीएचआरचे अंकल यांची देखील कारागृहातून बळजबरीने बदली करुन दिली