कारमधून कोरड्या भांगेची तस्करी करणारे अटकेत

0

धुळे । इंडिगो कारमधून कोरड्या भांगची वाहतूक होत असल्याचे चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणले असून कारसह भांग जप्त करुन दोघांवर गुन्हाही दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चाळीसगांवरोडवर सोमवारी सायंकाळी पाळत ठेवली होती. पोलिसांना हवी असलेली एमएच 39/जे 1478 ही इंडिगो कार 5.20 च्या सुमारास सोना कब्रस्तान जवळ आली असता पोलिसांनी तपासणीसाठी ती थांबवली.

तब्बल 200 किलो कोरडा भांग पकडला
या तपासणीत पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाले. या इंडिगो कारमध्ये तब्बल 200 किलो कोरडा भांग आणण्यात आला होता. हा माल धुळ्यातील माधवपुरा पाला बाजारात नेला जात असल्याचेही या तपासणीत उघड झाले. अखेरीस पोलिसांनी 200 किलो कोरड्या भांगसह इंडिगो कार मिळून सुमारे 3 लाख 80 हजाराचा ऐवज जप्त केला. ही कारवाई चाळीसगांवरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक हेमंत पाटीलसह उपनिरिक्षक ए.ल.शिंदे, हे.कॉ. आर.ए.शिरसाठ, पो.ना.प्रभाकर बैसाणे, डी.बी.पाटील, पो.कॉ.साहेबराव भदाणे, जोएब पठाण यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पो.कॉ.प्रेमराज पाटील यांची फिर्याद नोंदवून घेत कार चालक राजेशभाऊ इंदोर याचेसह धुळ्यातील माल खरेदीदार सिद्धार्थ रविंद्र राणा अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक शिंदे करीत आहे.