करण जोहरने शेअर केले एक अविश्वसनीय फोटो

0

मुंबई : बॉलीवूडचा खुशमिजाज दिग्दर्शक करण जोहरने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात बॉलिवूडचे काही सुपरस्टार एकत्र आलेले दिसत आहे.

करणने शेअर केलेल्या फोटोत शाहरुख खान, आमिर खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आहेत. या फोटो मध्ये सर्वजण आतिशय खुश दिसू येत आहेत. कदाचित हे सर्वजण एका चित्रपटात काम करण्याचा संदेश प्रेक्षकांना देत असावेत. रणवीर आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाच्या लूकमध्ये दिसला. याचबरोबर दीपिकाने ग्रे कलरचा माक्सी ड्रेस घातला होता.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग लवकरच ‘गली बॉय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात रणबीर आणि आलिया एकत्र काम करत आहे.

Copy