कारच्या नावाने आठ लाखांचा गंडा

जनशक्ती न्यूज | धुळे जिल्हा | इनोव्हा कारसाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज करून देतो असे सांगून शहरातील भगामोहननगर परिसरात राहणाऱ्या नागरिकाला सुमारे ८ लाख २८ हजारांचा गंडा घालण्यात आला.

याविषयी जितेंद्र सुरेश सूर्यवंशी (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार इनोव्हा कारसाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज प्रकरण करून देतो, असे आमिष सचिन सोपान लांडगे, सोनाली अशोक पाटील (दोघे. रा. सोलापूर) यांनी दाखवले. त्यावर जितेंद्र सूर्यवंशी, त्यांचे नातलग सुमीत चौधरी, श्वेता पारेख, मित्र मच्छिंद्र पाटील यांनी विश्वास ठेवला. तसेच बँक खात्यात पैसेही भरले. पण कार मिळाली नाही व कर्जही मंजूर झाले नाही. त्यातून सुमारे ८ लाख २८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही फसवणूक २७ मार्च २०२१ ते अाजपर्यंत झाली. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक एम. जे. सय्यद तपास करत आहे.

धुळे, मुंबई, अहमदाबादला केला होता भरणा
सूर्यवंशी, चौधरी, पारेख व पाटील हे परस्परांना ओळखतात. दोघा संशयितांशी धुळ्यात त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर सूर्यवंशी यांनी धुळ्यातून पैसे भरले. चौधरी यांनी मुंबई, तर कासोदा येथील मच्छिंद्र पाटील यांनी जळगाव व मुंबईतील पारेख यांनी अहमदाबाद येथील बँकेतून पैसे भरले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

Copy