Private Advt

कानळदा रस्त्यावर अपघात : अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा

जळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 1 रोजी काळनदा रस्त्यावर घडली होती. अपघातप्रकरणी मंगळवार, 8 मार्च रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील दुचाकीस्वार जखमी
जळगाव शहरातील राजाराम नगरातील रहिवासी हंसराज श्रीराम बिर्‍हाडे (30) हे मजुरी काम करतात. मंगळवार, 1 मार्च रोजी ते दुचाकी (एम.एच.19 सी.एल 6915) ने कामानिमित्ताने चोपड्याकडे गेले होते. तेथून परतत असताना कानळदा रोडवर कुवारखेडा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने बिर्‍हाडे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने बिर्‍हाडे यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी मंगळवार, 8 मार्च रोजी हंसराज यांचे भाऊ धनराज श्रीराम बिर्‍हाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुशील पाटील करीत आहेत.