Private Advt

कानळदा नाक्यावर अपघात : वाहन चालकाविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील कानळदा नाका येथे भरधाव वेगाने येणार्‍या कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने जळगावातील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगावातील दुचाकीस्वार जखमी
शहरातील शिवाजी नगरातील कानळदा नाका येथे हुसैनशाह शब्बीर शहा (22, रा.गेंदालाल मिल, जळगाव) हा तरुण दुचाकीने जात असतांना समोरून येणारी भरधाव कार (एम.एच.19 बी.जे.8306) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार हुसैन शाह यांचे दोन्ही पाय आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, कार चालकाने मदत न करता थेट दुचाकीस्वाराला दमदाटी करीत तुला काय करायचे आहे, ते करून घे अशी धमकी देवून कार घेवून पळ काढला. या प्रकरणी हुसैन शाह यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील बडगुजर करीत आहे.