काठीच्या राजवाडी होळीसाठी यंदा ‘इव्हेंट मॅनेजमेंट ’!

0

नंदुरबार ।काठीच्या होळी आदिवासी समाजात मोठे स्थान आहे, येथील होळीला राजवाडी होळी असेही संबोधले जाते. सातपुड्यात वसलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले काठी संस्थानाही राजवाडी होळीसाठी यंदा इव्हेंट मॅनेजमेंट करण्याचा पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रयत्न केला असून यावेळी काठीच्या होळी उत्सवात देश विदेशातून येणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स, राजवाडी होळीच्या बाबतीत माहिती पुस्तिका, ज्याठिकाणी हा कार्यक्रम होतो. त्याठिकाणी एल ई डी वॉल, वैगरे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यामुळे पर्यटकांना विशेष सुविधा प्राप्त होणार आहेत.

बाराव्या शतकाची परंपरा
धुलीवंदन सातपुडा मधील आदिवासींचे कुलदैवत राजा फांटा, गांडा ठाकूर,यांनी हॉलिकोत्सव प्रारंभ केला त्यानंतर काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या कारकीर्दीपासून 1246 पासूनची ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. आजही हा पारंपरिक उत्सव मोठ्या जलोषात साजरी केला जातो. या काळात ढोलाचा आवाज सातपुड्याच्या कानाकोपर्‍यात निनादतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करतात.

पारंपारिक वेशभूषा
आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून येथील हनुमान मंदिर,राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जाते. डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार तर महिला गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साजशृंगार करतात.

ढोल-ताशांच्या गजरात भोंगर्‍या
शस्त्रपूजन करुन आपले शक्ती प्रदर्शन करता येते होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह यांच्या सरकारची राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून गादीची माती कपाळाला लावतात. नर्मदा परिसरातील गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून अबालवृद्ध एकत्र येतात. सर्वप्रथम होळी मातेची पूजा वडाच्या वृक्षाखाली होळी मातेचे भक्त सतीराम महाराज,गोमर्‍या पुजारा यांच्या हस्ते होऊन सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन ढोलताशांच्या गजरात भोंगर्‍या मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढण्यात येते.