काटेरी झुडूपे देताय अपघाताला आमंत्रण

0

वरणगाव फॅक्टरी कारखान्यात जाणार्‍या कर्मचार्‍यांना मनस्ताप

वरणगाव- आयुध निर्माणी वरणगाव रस्त्यावर दोघा बाजूने काटेरी झुडूपांची वाढ झाल्याने फॅक्टरी कारखान्यात जाणार्‍या कर्मचार्‍यांना रस्त्याने ये-जा करीत असंताना काटेरी झुडूपे अडथळा ठरत असल्याने याबाबत दखल घेण्याची मागणी होत आहे. या झुडूपांमुळे अडथळा निर्माण होत असल्याने या ठिकाणी अपघात नित्याची बाब ठरत आहेत. हा रस्ता वरणगाव नगर परीषदेच्या अखत्यारीत येत असल्याने फॅक्टरी कर्मचार्‍यांनी पालिकेत लेखी व तोंडी तक्रार देवून ही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.

पालिकेकडे लेखी तक्रार
अनेक दिवसांपासून वरणगाव ते वरणगाव फॅक्टरीत जाणार्‍या रस्त्याने काटेरी झुडूपे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असल्याने कर्मचार्‍यांना येतांना-जातांना काटेरी झुडूपे अडथळा ठरत आहे. या कारणामुळे अनेक वेळा या रस्त्यावर लहान-मोठे अपघातदेखील झाले आहेत. पालिकेच्या अखत्यारीत रस्त्यावरचे काटेरी बाभूळ व अन्य झुडूपे अडथळा बनलेली आहे. ती लवकरात लवकर तोडून त्यांचा बंदोबस्त करावा तसेच मागील दोन वर्षापासून याच रस्त्यावर डंपींग ग्राऊंड पालिकेने बनवले आहे. कचरा, काच, खिळे, दगड, पत्रा हा रस्त्यावर येत असल्याने वाहने कायम पंक्चर होत असतात तसेच रस्त्याने इलेक्ट्रीक पोलवरील बंद पडलेले पथदिवे लावण्यात यावे, अशी लेखी पत्राद्वारे वरणगाव नगरपालिकेला करण्यात आली आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर हितेश भंगाळे, अमोल खलसे, पंकज पाटील, योगेशकुमार पाटील, निलेश माळी, राहुल पाटील, निलेश आठवलेकर, राजेश सोनार, प्रशांत श्रावणी, केशव भंगाळे, प्रकाश खाचणे, अतुल गोरले, एस.जे.घुले, सुरज झांबरे, रवींद्र आवटे, राहुल राणे, योगेश झांबरे, यू.जी.कोलते, पी.डब्ल्यू तोडकर, ए.वाय.इंगळे, आर.एम.अग्रवाल, व्ही.आर.जावळे, ए.पी.जावळे, अनिल डोयसे, प्रशांत भारंबे, राजेंद्र पाटील, प्रवीण बढे, मयूर जावळे, उपेंद्र सुरवाडे, विनायक भोळे आदी वरणगाव फॅक्टरीतील कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Copy