काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन

0

गुरुग्राम: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी खासदार अहमद पटेल यांचे आज बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबरमध्ये त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचे निधन झाले. पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसवर मोठी शोककळा पसरली आहे. अहमद पटेल हे दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे विश्वासू मानले जात होते. गांधी घराण्याचे ते राजकीय सल्लागार देखील मानले जात होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

It is a sad day. Shri Ahmed Patel was a pillar of the Congress party. He lived and breathed Congress and stood with the party through its most difficult times. He was a tremendous asset.

We will miss him. My love and condolences to Faisal, Mumtaz & the family. https://t.co/sZaOXOIMEX

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांनी काँग्रेसकडून मोठी भूमिका निभावली होती. आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री देखील राहिलेले आहे.

Copy