काँग्रेसतर्फे पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन

0

जळगाव : देशात नोटबंदीनंतर उद्भवलेल्या अडचणीमुळे देशातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणार हाल होत असल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शासकीय अधिकारी समर्थन करणारे असल्याच्याही घोषणा यावेळी दिल्या गेल्या. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार पोलिसांच्या उपस्थितीत बंद करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी हजर नसल्याने संताप
जिल्हाधिकारी यांचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना नोटाबंदीबाबतचे निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी हजर नसल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्याठिकाणी जिल्हाधिकारी अग्रवाल कार्यालयात नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले. जिल्हाधिकारी येईपर्यंत कार्यालयाच्या दालनासमोर ठिय्या मांडला. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, डॉ.ए.जी. भंगाळे, डॉ. उल्हास पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, प्रभाकर सोनवणे, अजबराव पाटील, शाम तायडे, अमजदखान पठाण, उल्हास साबळे आदी उपस्थित होते.