काँग्रेसच्या बैठकीत आगामी निवडणुकीवर विचारमंथन

0

वरणगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसंदर्भात येथील कॉग्रेस पक्षाच्या बैठकीचे आयोजन विश्रामगृहात करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थानी के.बी. काझी होते. बैठकीत कुर्‍हा, वराडसिम जिल्हा परिषद गट व हतनूर, तळवेल पंचायत समिती गटातील इच्छूक उमेद्वार महिला व पुरुष बैठकीत हजर होते.

या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाबद्दल मार्गदर्शन केले व समविचारी पक्षाशी आघाडी करायची किवा नाही. तसेच जिल्हा अध्यक्षाच्या आदेशाने केली जाईल, असे सर्वांमते ठरविण्यात आले आहे. या बैठकीचे प्रास्तविक कॉग्रेस उपजिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. यावेळी भगवान भोई, ऐहतोशामोद्दीन काझी, शैलेश बोदडे, पंकज पाटील, राजेंद्र पालीमकर, मनोज देशमुख, प्रशांत पाटील, मल्लू पहेलवान, शोभा भिल, सुदर्शन जाधव, अशांत सोनवणे, गजानन देशमुख, धनाबाई भिल आदी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.