कस्तुरबा विद्यालयात सांस्कृतिक महोत्सव

0

चोपडा । येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयात मंगळवार 27 व 28 डिसेंबर रोजी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जळगाव येथील जेष्ठ रंग कर्मी शंभू पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. सांस्कृतिक महोत्सवात 27 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, कार्यानुभव अंतर्गत वस्तु प्रदर्शन तर 28 डिसेंबर रोजी आनंद मेळव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पालकांना उपस्थितीचे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.डी.साठे यांनी केले आहे.