कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर !

0

साउहॅम्प्टन: वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड संघाचा 8 जुलैपासून कसोटी सामना होत आहे. पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज शनिवारी 13 सदस्यीय संघ जाहीर केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. जो रूट कसोटी खेळणार नाही. त्यामुळे स्टोक्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघासह 9 राखीव सदस्यांची घोषणाही करण्यात आली. 8 ते 12 जुलै – साउहॅम्प्टन, 16 ते 20 जुलै- मँचेस्टर, 24 ते 28 जुलै- मँचेस्टरला कसोटी सामने होणार आहेत.

इंग्लंडचा संघ
बेन स्टोक्स ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर ( यष्टिरक्षक), झॅक क्रॅवली, जो डेन्ली, ऑली पोप, डॉम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड
राखीव खेळाडू – जेम्स ब्रेसीय, सॅम कुरन, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, सकीब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबीन्सन, ऑली स्टोन.

Copy