कवळीथ येथील ब्रिटीश कालीन बंधाऱ्याची आमदारांकडून पाहणी

3

शहादा/असलोद: तालुक्यातील कवळीथ गावाजवळ वळण बंधारा असुन हा बंधारा ब्रिटीशकालीन बंधारा आहे. बंधाऱ्याचा सुमारे 2 ते 3 हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रास प्रत्यक्ष लाभ होत असतो. तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. या बंधाऱ्याची नुकतीच आ. राजेश तडवी यांनी पाहणी केली.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे बंधाऱ्याच्या कालव्याची संरक्षक भिंत पडुन गेल्याने गोमाई नदीचे पाणी कालव्यात वळवता येत नाही. त्यामुळे कालवा बंद पडला असुन लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे भिंत त्वरित दुरूस्त करण्यात यावी, त्यासाठी निधीची तरतुद करण्यात येईल. संबंधित यंत्रणेला अंदाज पत्रक तयार करण्याच्या सुचना दिल्या. तसेच जिल्हा नियोजन किवा इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून कालवा सुरु करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन हा प्रश्न मार्गी लावु, असे आ.राजेश पाडवी यांनी सांगितले.
यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, माजी जि.प. सदस्य सुनील चव्हाण, योगेश पाटील, खेडदिगर सरपंच अविनाश मुसळदे, विरसिंगजी पाडवी, विठ्ठलराव बागले, पाठबधारे अभियंता एम.बी. पाटील, मोहिदा सरपंच गिरधर पाटील, उपसरपंच पुरुषोत्तम पाटील, राजाराम पाटील, जगदीश पाटील, ईश्वर पाटील,गोगापुर सरपंच विजय सोनवणे, भागापुर सरपंच निलेश पाटील, कवळीथ सरपंच योगेश पाटील अादी उपस्थित होते.

Copy